HW News Marathi
मुंबई

Dahi Handi | महिला पथकाने मिळवला दादरमधील सेनेची हंडी फोडण्याचा मान

मुंबई | दादर येथील नक्षत्र मॉल परिसरातील शिवसेना शाखा क्रमांक. 192 ची मानाची दहीहंडी विक्रोळी टागोर नगर महिला गोविंदा पथकाने फोडली आहे. टागोर नगर महिला पथकाने पाच थरांची विजयी सलामी देत दादरमधील शिवसेनेची मानाची दहीहंडी फोडण्याचा पहिला मान मिळवला आहे. तसेच या महिला पथकाने आयडीएलच्या दहीहंडीलादेखील सलामी दिली. माजी नगरसेवक प्रकाश बबन पाटणकर हे याचे आयोजक आहेत.

टागोर नगर मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या महिला पथकाने एकावर एक असे पाच थर रचून 50 अंक मोजले आणि त्यानंतर हंडी फोडली. यानंतर हे महिला गोविंदा पथक कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे इथल्या मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहे.

मुंबईत सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. आयोजकांनी आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात एका पाठोपाठ अनेक पथके येऊन या साहसी खेळातील आपले कौशल्य दाखवत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पत्नीच्या विरहाने पतीचेही निधन

News Desk

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे १३.४२ कोटी थकविले

swarit

भाजप ही सिंहाची पार्टी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk
देश / विदेश

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

वी दिल्ली- आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. चार वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. मात्र, अद्याप पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले असून त्यानंतरच आसाराम बापुच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

76 वर्षीय आसाराम बापुने 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

Related posts

सुनावणीसाठी न्यायालयात जाणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

News Desk

इस्त्रोची मोहीम फेल, क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाल्याने मिशन रद्द!

News Desk

कृषी कायदा रद्द होणार नाही अमित शाहांनी केले स्पष्ट, तर आजची होणारी बैठकही रद्द

News Desk