HW News Marathi
कृषी

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

वर्धा । देवळी येथील शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आणि तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. सदर बाब काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अस्मिता मेसरे तसेच प्रियंका आडे यांना सांगितली असता त्यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून अहवाल तयार करीत तो वरिष्ठांना सादर केला आहे.

तालुक्यातील मौजा नागझरी व बेलगाव येथे हुमनी नावाच्या अळीचा सोयाबीन व तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी संपूर्ण झाड उलथावून लावत आहे. आधीच कमी पावसामुळे सोयाबीन पीक संकटात आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देत सोयाबीन व तूर उत्पादक शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती कृषी अधिकारी यांना दुरध्वनीवरुन दिली.

या अळीचे भुंगे जमिनीवर येवून अंडी घालतात. याप्रकारे अंडीतून निघालेल्या अळीचा कुजलेल्या शेणखताचे माध्यमातून शेतापर्यंत प्रवास असतो. या अळीचा वेळीच नायनाट न केल्यास संपूर्ण पीक धोक्यात येण्याची भीती असते. अळीचा प्रादुर्भाव असलेल्या या भागात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी व तालुका कृषी कार्यालयाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. हुमनी अळीचा प्रकोप असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतांचे पंचनामे व उपाय-योजना केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar

साखरा येथे संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन

News Desk

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

News Desk
महाराष्ट्र

सनातन संस्थांवर बंदी घाला, अशोक चव्हाण यांची मागणी

swarit

मुंबई | दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील सनातन संस्थेच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती.

दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपारा येथून २० बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. नालासोपाऱ्यातून वैभव राऊत तर शरद काळसकर आणि गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक केले आहे. स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांमध्ये अनुचित घडविणे यामागचे षडयंत्र असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तस भाजप सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीवर गंभीर नसल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखविले.

सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Related posts

विद्युत वाहिनीवर टॉवर पडल्याने वीजपुरवठा खंडित

News Desk

आमच्या मध्यस्थिमुळेच सेना – कंगनातील वाद निवळला, आठवलेंचा दावा

News Desk

“सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!”

News Desk