HW News Marathi
मुंबई

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर १४ ऑगस्टला सुनावणी

मुंबई | येत्या १४ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला आहे. आरक्षण ज्या अहवालावर अवलंबून आहे. तो राज्य मागास आयोगाचा अहवाल येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.राज्यभर मराठा आंदोलन पेटल्यानंतर सरकार मागास आयोगाच्या अहवाला येण्याची वाट पाहत आहे.

मराठा आरक्षण समितीने हा अहवाल लवकरात लवकर द्यावा, म्हणून मागास आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश एम. जी गायकवाड यांची भेट घेणार आहे. परंतु हा अहवाल येण्यास अजून चार महिने लागणार असल्याचे विभागाच्या सचिवांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षणा देण्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य मागास आयोगा नमलेल्या पाच संस्थांचा अहवाल ३१ जुलैला येणार असून या अहवालात आतापर्यंत ७०० गावांचा अभ्यास आहे. मात्र, मागास आयोगाचा मुख्य अहवाल सादर करण्यासाठी आणखी चार महिने लागणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे मृतदेह सापडल्याने खळबळ

swarit

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk