HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही | मराठा क्रांती मोर्चा

पंढरपूर | मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यावर राज्य सरकारने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची पूजा न करू देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्याव्यापी बैठकीत सोमवारी येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाने राज्यभरात ५८ विशाल मोर्चे काढले, तरी सुद्धा सरकार आमची दखल घेत नसल्याचा आरोप या मराठा समाजाने या बैठकीत घेतला आहे. ‘आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नसल्याचे,’ मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कोपर्डी घडनेतील अत्याचारित मुलीचे वडील बबन सुद्रीक, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, मिलिंद भोसले आदी उपस्थित होते.

Related posts

भाजपच्या मंत्र्याकडून बीफ खाण्याचं समर्थन!, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

Aprna
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk