HW News Marathi
क्राइम

कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर १६ जुलैला होणार सुनावणी

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दोषमुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै रोजी अंतिम सुनावणी केली आहे.

मालेगावमधील २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित यांना ऑगस्ट २०१७ मध्ये जामीन मंजूर केले होता. यानंतर पुरोहित यांनी या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कौमार्य चाचणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पुण्यात तिघांवर हल्ला

swarit

भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची क्रूर हत्या

Gauri Tilekar

4 बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Manasi Devkar
महाराष्ट्र

कर्ज मंजूरीसाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

News Desk

मलकापूर | शेतक-याच्या पत्नीकडे पीक कर्जाच्या मंजूरीसाठी अधिका-याने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक बाब मलकापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पिककर्जा सोबत वेगळा पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला.संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

 

Related posts

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

News Desk

“नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार” – अशोक चव्हाण  

News Desk

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

News Desk