HW News Marathi
कृषी

सरकार आता रिलायन्स, रामदेव बाबा यांच्या दुधाची वाट पाहतेय का? 

नागपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर, पावसाळी अधिवेशनात देखील पडताना दिसत आहे. आता सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहते का? असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असल्याची टीका देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. समाधानकारक पाऊस पडत आहे. तर शेतकरी शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळी सरकारने आणली आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणारच नाही का ?, हे जणू सरकारने धोरण ठरवले आहे काय ?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रुपये भाव जाहीर केला होता. परंतु शेतकऱ्यांना केवळ १७ रुपये भाव मिळत आहे. यामुळे गतवर्षापासून शेतकरी प्रतिलिटर मागे १० रुपयांची फसवणूक सरकार करत असल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली आहे. या आंदोलन केल्यानंतर सरकार केवळ आश्वासन देते, असे देखील मुंडे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

News Desk

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk
महाराष्ट्र

आजपासून १२ वीचे ऑनलाईन फॉर्म

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. सरल प्रणालीच्या माध्यमातून अर्ज भरण्याची सूचना मंडळाने केली आहे. मंडळाने अद्यापही परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केलेले नाही.

अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विलंबित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येतील. सरल प्रणालीमध्ये नोंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज वैध ठरणार असल्याने अकरावीमधील अनियमित प्रवेश समोर येणार आहेत.

mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. परीक्षेचे वेळापत्रक मात्र जाहीर केलेले नाही.

Related posts

बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार

News Desk

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

News Desk

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा अडवला ताफा

News Desk