HW News Marathi
कृषी

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई | ‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध स्वस्त झाल्याने त्रस्त आहेत. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी शेट्टींनी केली आहे.दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला.

“घरातले दूध आणि भाजीपाला रस्त्यावर कशाला ओतता?” असा सवाल करत दूध रोखणे ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्यानुसार शासन होईल असेही चंद्रकांत पाटील सांगायला विसरले नाहीत. यापूर्वी राजू शेट्टींनी प्रामुख्याने पुणे, नाशिक अहमदनगर वरून जाणारे दूध रोखणार असल्याचे सांगितले होते. तर कर्नाटक , गुजरात, हैद्राबाद वरून मुंबईला येणारं दूध रोखणार असल्याचा इशारा दिलाय. तसेच दूध संघांनी आमच्या आंदोलनाला विरोध करू नये. तसे केल्यास कायदा हातात घेणार असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk

साखरा येथे संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन

News Desk

तूर, उडीद दर हजारांनी घसरले, विक्रीची तूर्त घाई नको

News Desk
कृषी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk

मुंबई | गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत, त्यामुळे संघांनी शेतक़र्‍यांच्या भानगडीत पडू नये. गायी घ्यायला पैसे दिले म्हणून दूध संघांकडून उत्पादकांवर संकलनाची सक्ती कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दूध संघांना दिला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध स्वस्त झाल्याने त्रस्त आहेत. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी शेट्टीनी केली आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे.

दूध संकलनासाठी जबरदस्‍ती केली तर गाठ आमच्याशी असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूध दरासाठीची आमची ही लढाई आरपारची आहे, तुम्ही दर वाढवून द्या नाही तर आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दूध पावडरचे दर कोसळणार, याची जाणीव करून देताना. दीड वर्षापूर्वीच सरकारला आठवण करून दिली होती. पण त्यांनी लक्ष दिले नाही. पावडरला थेट अनुदान देता येत नसेल तर उत्पादकाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्या, अशी आमची मागणी आहे.

मुंबईकाराची माफी मागून हे आदोलन करत आहोत. मुंबईतले तिन्ही मार्ग बंद करुन बाहेरील राज्यातील दूध मुंबई शहरात येऊ देणार नाही असा इशारा दिला देताना आम्ही कायदा हातात घेत आहोत सरकारला काय करायचे आहे ते सरकारने करावे अस आव्हान ही सरकारला दिले आहे. याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी काय केले दूध उत्पादकांसाठी ते आधी सांगा मोदींनी पाकिस्तानातून साखर आणली आणि विकली मुंबई काय पाकिस्तानात येत नाही हे आम्हाला माहीत आहे. कर्नाटक प्रतिलिटर चार रुपये, गोवा, केरळ राज्य आठ रुपये देत आहे, आम्ही फक्त पाच रुपये मागतो आणि ते देणेही शक्य आहे असे यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी म्हणाले.

Related posts

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit

पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत      

News Desk

शेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार ! विखे पाटील

News Desk