HW News Marathi
क्राइम

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एक जण ताब्यात

मुंबई | औरंगाबाद एटीएसकडून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी जालन्यातून गणेश कपाळे या इसमाला आज (बुधवारी) ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश डीटीपी ऑपरेटर आहे. त्याचप्रमाणे जालन्यात त्याचे झेरॉक्स आणि स्टेशनरीचे दुकान आहे. डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणासह नालासोपारा स्फोटके प्रकरणीही गणेशवर संशय व्यक्त केला जात आहे. गणेश कपाळे हा आरोपी श्रीकांत पांगरकर याचा मित्र असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. श्रीकांत पांगारकरला देखील एटीसीकडून अटक करण्यात आली होती. वैभव राऊत यांच्या घरी सापडलेल्या स्फोटकांमागे श्रीकांत पांगारकरची मोठी आर्थिक मदत केली असल्याचा दावाही सीबीआयने केला होता.

याआधी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रकरणात जळगावमधील एका संशयिताला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात यावल तालुक्यातील साकळी येथे विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (२२) या तरुणाला गुरुवारी ताब्यात घेतले होते. डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वापरण्यात आलेले वाहन हे साकळी येथील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. एटीएसच्या दोन पथकांपैकी एका पथकाने विशालला ताब्यात घेऊन तात्काळ अज्ञातस्थळी हलवले आणि त्यानंतर दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रशियन महिलेची भर रस्त्यात छेडछाड

News Desk

श्री रेणुकामाता मंदिर परिसरात कार-बसचा भीषण अपघात

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk
मुंबई

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk

मुंबई | कुलाबा परिसरात राहणाऱ्या 5 शाळकरी मुली शुक्रवारपासून बेपत्ता होत्या. कालपासून बेपत्ता असलेल्या पाचही मुलींना शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश आले असून कालपासून या मुलींनी मरीन ड्राइव्ह ते ठाणे आणि ठाण्यापासून पुन्हा कुर्ला असा प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

फोर्ट विभागात असलेल्या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये आठवीच्या वर्गात या मुली शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परीक्षेचा निकाल आल्यानंतर कमी मार्क्स मिळाले म्हणून त्या शाळेतून घरी परत न येता मरीन ड्राइव्ह ला गेल्या तिथून पुन्हा हँगिंग गार्डन आणि नंतर ठाणे असा प्रवास केला असल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी दुपारी त्यांना कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या मुली शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नसल्याने मुलींच्या पालकांनी लगेच कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मुंबईतल्या सगळ्या पोलीस ठाण्यात या मुलीचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. तसेच मुली सापडल्यास कुलाबा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला असता कुर्ला येथून या मुलींना ताब्यात घेण्यात आलेे आहे.

Related posts

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

सपा उमेदवारांनाच निवडून द्या अबू आझमी यांचे आवाहन

News Desk