HW News Marathi
क्राइम

प्रेमभंग झाला म्हणून पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर केले अपलोड

बंगळुरु (वृत्तसंस्था) : प्रेमसंबंध तुटले म्हणून संतापलेल्या प्रियकराने पूर्वप्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये समोर आली आहे. शौविक भवन (२२) असे आरोपीचे नाव असून बंगळुरु पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शौविक मॅनेजमेंटच्या दुस-या वषार्चा विद्यार्थी आहे. शौविक आणि पीडित तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. काही कारणांवरुन वाद झाल्यामुळे पीडित तरुणीने रिलेशनशिप कायम ठेवायला नकार दिला.

पण शौविकला हा नकार पचवता आला नाही. त्याने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूर्वप्रेयसीचे न्यूड फोटो पोस्ट केले. शौविक आसाम तेजपूरचा राहणारा आहे. त्याने पूर्वप्रेयसीबरोबर प्रणयाच्या क्षणाचेही काही फोटो काढले होते. संबंध कायम ठेवले नाहीस तर, प्रणयाच्या क्षणाचे काढलेले फोटो तेजपूरमध्ये व्हायरल करीन अशी धमकी त्याने दिली होती. शौविकने इन्स्टाग्रामवर पूर्वप्रेयसीचे न्यूड फोटो अपलोड केले तेव्हा त्याखाली शरीरविक्रीय करणारी महिला असा तिचा उल्लेख करुन तिचा मोबाईल नंबर दिला होता अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.

पीडित तरुणीला जेव्हा मित्र-मैत्रिणींकडून तिचे असे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्याचे समजले. तेव्हा तिने थेट पोलीस स्टेशन गाठून शौविक विरोधात तक्रार दिली. शौविकच्या या कृत्यामुळे रेट किती अशी विचारणा करणारे अनेक फोन तिला आले. पीडित तरुणी मुंबई येथील कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटचे शिक्षण घेत आहे. शौविकने पीडित तरुणीचे जवळपास २० न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. शौविक पीडित तरुणीला भेटायला मुंबईला जात असताना बंगळुरु एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चायनीज विक्रेत्याने गिऱ्हाईकाच्या अगावर फेकलं उकळतं तेल video

News Desk

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat

गोवंडीत 3 पिस्तुल, 14 काडतुसांसह दोघांना अटक

Manasi Devkar