HW News Marathi
राजकारण

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त शेअर बाजारासाठी नकारात्मक

मुंबई | शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपूजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहूर्त’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. शेअर बाजारात दरवर्षी लक्ष्मीपूजनानिमित्त दीड तासांचे विशेष सत्र होते.

परंतु या सत्रात दमदार खरेदी होऊन बाजार वधारण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा असते. पण गेल्या वर्षी ‘मुहूर्त’ सत्रात बाजार घसरला होता. या सत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीचा परतावासुद्धा आधीपेक्षा कमी होता. त्यामुळे यंदा या सत्राबाबत गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा साशंकता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला रोज एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही !

News Desk

HW Exclusive : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान भाजपकडून पैशाचे वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Chetan Kirdat

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्विकारणार?

News Desk