HW News Marathi
मनोरंजन

पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई | पु. ल. देशपांडे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे खरेच ‘महाराष्ट्र भूषण’ होते. महाराष्ट्राचे लाडके ‘भाई’ अर्थात पुलंच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. पण आता पुलंचीच जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्माते- दिग्दर्शक महेश मांजरेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी महेश मांजरेकर यांनी सुरू केली आहे. या बॅनरअंतर्गत हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत. यावर्षी पुलंच्या जयंतीदिनी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने याच काळात म्हणजेच ४ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी घोषणा ११ जून रोजी वरळी येथे करण्यात आली.

‘पुलंवर मराठी माणसाचे किती प्रेम आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचा अभिनय, त्यांचे साहित्य, त्यांचे वक्तृत्व, त्यांचा संगीताचा अभ्यास, त्यांचा दानशूरपणा, त्यांनी जपलेले सामाजिक भान हे सगळे आपण पाहिले आणि ऐकले आहे. त्याबद्दल अनेकदा वाचलेही आहे. पण असा हा अष्टपैलू अवलिया, माणूस म्हणून नेमका कसा होता? या लाडक्या व्यक्तिमत्वाचे व्यक्तिगत आयुष्य नेमके कसे होते, याबाबत फारसे कधी लोकांसमोर आलेच नाही. म्हणूनच ‘भाई: व्यक्ती की वल्ली’मधून पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्याचे अप्रकाशित पैलू प्रेक्षकांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.” महेश मांजरेकर यांनी चित्रपट निर्मिती मागील भूमिका स्पष्ट केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#IndependenceDay : भ्रष्टाचार, हिंसाचार, जातीय-धार्मिक भेदभाव मुक्त देश !

News Desk

या अभिनेत्रीकडे झाली होती शारीरिक सुखाची मागणी

News Desk

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk
राजकारण

हार्दिकच्या टिकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

News Desk

इंदूर | पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हार्दिक यांनी राहुल यांच्या पेहरावाची आणि देहबोलीवरून टिप्पणी केली. हार्दिक यांनी म्हटले की, राहुल गांधी अनेकदा भाषणादरम्यान आपल्या सदऱ्याच्या बाह्या वर करत असतात. याचा त्रास होत असले तर राहुल यांनी योग्य कपडे घातले पाहिजेत. राहुल गांधींनी जीन्स घालावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा राजस्थानमध्ये गेले तेव्हा त्यांनी जोधपुरी सूट घातला होता. यानंतर लोकांनी त्यांना स्वीकारले होते. काळ बदलत असतो. त्यामुळे राहुल गांधींनीही खादीचे कपडे घालणे व सदऱ्याच्या बाह्या वर करण्याची सवय सोडली तर देश त्यांनाही स्वीकारेल, असे हार्दिक यांनी म्हटले.

यानंतर काँग्रेस नेत्यांकडून हार्दिक यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले. हार्दिक पटेल हल्ली फॅशन डिझायनरचेही काम करतात हे आम्हाला माहिती नव्हते. एखाद्याचे कपडे किंवा सदरा कसा असावा, हे सांगणे डिझायनरचेच काम असते. त्यामुळे हार्दिक यांनी राहुल गांधींना नसते सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असेही काँग्रेस कडून सांगण्यात आले आहे.

 

Related posts

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

Gauri Tilekar

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर केले सरकार स्थापन”, मुख्यमंत्र्यांचे विधान

Aprna

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Aprna