HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

पुणे | प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग यांचे वृद्धापकाळात निधन झालं आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. सारंग यांच्या जाण्याने सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. सारंग यांनी १९६८पासून नाट्यक्षेत्रात काम पदार्पण केले होते. सारंग याच्या नाटकांमधील अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून त्यांनी साकारलेली ‘सखाराम बाइंडर’ नाटकातील चंपा, ‘सहज जिंकी मना’ नाटकातील मुक्ता, ‘आक्रोश’ नाटकाली वनिता, ‘आरोप’ नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या.

२००६मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘गृहिणी सखी सचिव’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

News Desk

चॉकलेट गिफ्टवाली दिवाळी

swarit

ही मॉडेल लग्न न करताच होणार आई

News Desk