HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज घेणार पत्रकार परिषद

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा कोणत्याही क्षण होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आज (१८ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र आज निवडणूक जाहीर होणार नसल्याची शक्यता वर्तवली जाते. तर तीन सदस्यीय पथक दोन दिवस पाहणी करुन बैठक घेणार असून त्या बैठकीनंतर गुरुवारी (१९ सप्टेंबर) निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पथक राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी काल (१७ सप्टेंबर) राज्यात आले आहे. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी हे पथक दोन दिवस राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे, आयकर विभाग, उत्पादन शुल्क आणि इतर विभागांमधील अधिकाऱ्यांची भेट घेईल. तसेच हे त्रिसदस्यीय पथक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासोबतही बैठक घेणार आहेत. २०१४मध्ये राज्यात पाच टप्प्यात मतदान झाले होते. मात्र, यंदा महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीचे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याच सांगितल जात आहे.

अशी होती २०१४ची विधानसभा निवडणूक

२०१४ मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर होतील. तर २५ ऑक्टोबर यामुळे दिवाळीच्या आधीचे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याच सांगितल जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

News Desk

काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ५ वर्षाच्या काळात सर्वात जास्त जातीय तणाव, पोलिसांचा अहवाल

News Desk