मुंबई। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. आता भाजपमध्ये दुसऱ्या मेगाभरतीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. १ आणि ५ सप्टेंबरदम्यान मेगाभरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. १ सप्टेंबरला सोलापुरात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत तर ५ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यात खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांचे निकटवर्तीय उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांचा देखील भाजप प्रवेश होईल, अशा चर्चा आहेत. दोघेही जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर होते.
एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगता आहेत, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण इच्छुक असल्याचे कळते आहे. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.