HW News Marathi
महाराष्ट्र

5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली नवी तारीख जाहीर…!

पुणे। राज्यात दहावी आणि बारावीप्रमाणेच इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच 5वी आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 8 ऑगस्ट 2021 होती. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्धीपत्रक

याआधी देखिल 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 23 मे 2021 ला जाहीर करण्यात आली होती. यानुसार ही परीक्षा राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला घेण्यात येणार होती मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलून 9 ऑगस्ट 2021 ला होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्धीपत्रक जारी करून देण्यात आली आहे.

CBSE बोर्डानं असं म्हंटलं आहे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE अंतर्गत चालवण्यात येणारी कोणतीही शाळा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मनमानीनं 95 टक्केपेक्षा जास्त गुण देणार नाही. जर कोणतीही शाळा मंडळाच्या या नियमांचं पालन करत नसेल तर बोर्ड स्वतःच अशा विद्यार्थ्यांचे गुण कमी करेल असं बोर्डानं म्हंटलंय.

CBSE च्या नव्या सूचनांनुसार शाळांची मनमानी थांबवण्यासाठी मंडळानं हा निर्णय घेतला आहे. CBSE बोर्डानं असं म्हंटलंआहे की संदर्भ वर्षात ज्या विद्यार्थ्यांचा निकाल 95 टक्क्यांपेक्षा जास्त लागला होता अशा विद्यार्थ्यांनाच यावर्षी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळू शकतात. इतर कोणालाही इतके जास्त गुण मिळू शकत नाहीत. म्हणजेच जर संदर्भ वर्षात चार विद्यार्थ्यांना 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर यावर्षी देखील शाळा फक्त चार विद्यार्थ्यांनाच इतके गुण देऊ शकेल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या”, फडणवीसांची शिक्षकांच्या आंदोलनावरुन सरकारवर टीका

News Desk

किती दिवस मुस्कटदाबी आणि हुकूमशाही सहन करणार !

News Desk

“केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत तर स्वागतच”

News Desk