HW News Marathi
महाराष्ट्र

आशिष शेलार यांचा सासरवाडीत विजय तर जयंत पाटलांची सासरवाडीत हार!

सावंतवाडी | सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश मिळाले आहे. दांडेली हे गाव भाजपचे आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे.भाजप नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

एकीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांचा सासरवाडीत विजय झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मात्र सासरवाडीत हार मानावी लागली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील यांचे सत्ताधारी आणि विरोधी गटातून सर्व मेहुणे उभे होते. मात्र जयंत पाटील यांचे चुलत मेहुणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने इथे मोठा विजय मिळवला आहे. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल १५ तर राष्ट्रवादीला फक्त २ जागांवर विजय मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाचा २७ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा धडकणार

News Desk

संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती, तर अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

News Desk

खुशखबर ! बेस्टची भाडेवाढ नाही

News Desk