HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारींची दुसऱ्या फेरीत आघाडी कायम!

नागपूर | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारी दुसऱ्या फेरीत24,114 मते मिळवत आघाडीवर आहेत. तर नागपूरचे महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांना 16,852 इतकी मते दुसऱ्या फेरीत मिळाली आहेत. संदीप जोशी वंजारींपेक्षा 7262 मतांनी पिछाडीवर आहेत.

मतदारसंघात अभिजित वंजारी पहिल्या फेरीत 4850 मतांनी पुढे होते. तब्बल 12,617 मते मिळवत वंजारी या मतदारसंघात आघाडीवर होते. तर नागपूरचे महापौर संदीप जोशी हे 7767 मतांसह पिछाडीवर होते. राज्यातील यंदाची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरते. महाविकासआघाडी सरकार आणि भाजपने ही निवडणूक आणखी प्रतिष्ठेची बनवली आहे. म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

दरम्यान, १ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. तर आज (३ डिसेंबर) मतमोजणी सुरू आहे. मध्यरात्रीपर्यंत या निवडणुकीचे निकाल येण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकांच्या राजकीय समिकरणांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची ठरत असल्याचेही म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या बनावट आवाजाची एक क्लिप व्हायरल

News Desk

महाराष्ट्रातील  निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे

News Desk

सावित्रीबाई फुले विद्यापीठात ABVP चे पुंगी बजाव आंदोलन

News Desk