HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक!

सातारा। सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे आमदार असलेले शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मतानेच पराभव झालाय. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर अर्थातच राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आक्रमक होत दगडफेक केली आहे.

शिंदे यांचा एका मताने पराभव

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यापंचवार्षिक निवडणुकीचे निकाल हे अतिशय चुरशीचे लागले आहेत. जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मते मिळाली. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदेंना हा पराभव स्वीकारावा लागल्याचा आरोप करत शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं होते. मात्र याठिकाणी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. आणि पोलिस बंदोबस्त नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

शशिकांत शिंदे या पराभवानंतर म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. असं शशिकांत शिंदे जिल्हा बँक निवडणुकीच्या पराभवानंतर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत”, राऊतांचा निशाणा

News Desk

नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवलं!

News Desk

सतराव्या शतकात रायगड जसा होता तसा बघायला आवडेल

News Desk