HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात आघाडी झाली तर स्वागत, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू !

मुंबई | गोव्यात आघाडी झाली तर स्वागत आहे. जर नाही झाली तर आम्ही स्वतंत्रपणे लढू, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात केले आहे. गोव्यात आघाडी करण्यासंदर्भात पत्रकारांनी राऊतांना आज (१३ डिसेंबर) त्यावर ते म्हणाले, “काही लोकांशी नक्कीच चर्चा झाली. पण, प्रत्येक पक्षाला वेळ त्यावा लागतो. त्या राज्यात अशा प्रकारच्या आघाड्या करायच्या त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. ती प्रक्रिया थोडी मोठी असते. पण जर झाली अशी आघाडी तर त्यांचे स्वागत आहे. जर नाही आम्ही स्वातंत्रपणे लढू. आम्ही आधीच सांगितेल आहे की, आम्ही २२ जागांवर गोव्यात लढणार आहोत, आणि लढू.”

दरम्यान, राऊतांच्या त्या आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती यांनी त्यांच्यावर FIR गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पत्रकारांनी राऊतांना विचारल्यार राऊत म्हणाले, “मी मधल्या काळात एका शब्दाचा वापर केला. तो शब्द म्हणे भावना दुखवणार आहे. काय भावना दुखल्या, कोणाला मुर्ख म्हणे, अशिक्षित आणि आडाणी म्हणे, हे वारंवार आपण राजकाणात आणि समाजकारणात वापरतो. मी जो शब्द वापरला तो या देशातला नव्हते तर जगातल्या कोणत्याही शब्दकोशात आपण त्याचा अर्थ पाहिला तर त्यांचा अर्थ मुर्ख, अतिशाहणा आणि बुद्ध असा दिलेला आहे. जर या शब्दा विरोधात अशा प्रकारे तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही.”

सत्य बोलण्याचे थांबवणार नाही

राऊत म्हणाले, “माझ्याकडे ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना सरकार पाठवू शकत नाही. म्हणून बहुतेक त्यांनी नव्याने हा गुन्हा दाखल करून संसदेचे अधिवेशन सुरू असताना. एका खासदारावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी आमच्यावर असे कितीही गुन्हे दाखल केले. तरी आम्ही सत्य बोलण्याचे थांबवणार नाही. जे सत्य आहे ते आम्ही बोलणारच बघू पाहू.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं – चंद्रकांत पाटील

News Desk

सरकारमधील ओबीसी नेते पवार काका पुतण्यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत! – गोपीचंद पडळकर

News Desk

‘त्या’ बालकांच्या पालकांसमोर हात जोडून उभं राहण्यापलीकडे काही करु शकलो नाही !

News Desk