HW News Marathi
महाराष्ट्र

गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला

नागपूर | बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात नव्या विषयाला सुरुवात झाली. ते बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. पण, ते भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, अशी खोचक टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याबाबत अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला असता गुप्तेश्वर पांडे यांच्यावर अनिल देशमुख यांनी निशाणा साधला आहे.

बिहारचे माजी डीडीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांचा अंदाज येतो, असे अनिल देशमुख म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

News Desk

राज्यात दारू महागणार, उत्पादन शुल्कात वाढ – अजित पवार

News Desk

राज्यपालांनी अनोख्या पद्धतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

News Desk