HW News Marathi
महाराष्ट्र

ST संदर्भात अनिल परबांची सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या प्रस्तावाला सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसटी कर्मचाऱ्याबाबत सह्याद्री अतिथीगृह आज (२४ नोव्हेंबर) बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कार्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा केली आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा गेल्यानंतर परब राज्याचे अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेतून कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा निघणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. यापूर्वी कधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीसंदर्भात सर्व सामान्यांचे मत महत्त्वाचे आहे. तसेच एसटीचे विलीनीकरण केल्यावर अन्य मंडळे देखील विलीनीकरण करणाची मागणी करतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. पवारांनी आज (२४ नोव्हेंबर) साताऱ्यातील महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलत होते.गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. तर १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात सरकार विरोधात आंदोलन करत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंमत आहे का दंगल करण्याची? इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊतांचा इशारा

News Desk

३७६ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन राज्य सरकारची कारवाई

News Desk

उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य की त्यांच्यावर राज्य आलंय?

News Desk