HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा अन्यथा…!

पुणे | सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच NIAअंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी. अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता.अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का NIA अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

“या अधिकाऱ्यांचे नावे जाहीर करण्यात यावी, अनिल देशमुख यांनी नावे जाहीर केली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे”, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी याबाबतची माहिती दिली.

Related posts

प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स टीम नेमावी, मुख्यमंत्र्यांचा आदेश

News Desk

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाची अन्य पक्षांवर मात

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत बैठक पार पडली, शर्यत पुन्हा सुरू करण्याची मालकांची मागणी

News Desk