HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीकडून २ हजार कोटींची मदत

मुंबई | राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज (१२ फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळात घेतलेले सात महत्त्वाचे निर्णय आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात महत्त्वाचे सात निर्णय

  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरुपात वाढ.
  • पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता. पहिल्या टप्प्यात दुर्गम भागात ८० चिकित्सालये स्थापणार.
  • नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-१) करण्यास मान्यता.
  • केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राज्यात राबविण्यास मान्यता.
  • राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात ०५:४५:५० याप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता.
  • सेवानिवृत्त तालुका निरीक्षक भूमी अभिलेख बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लाचलुचपत प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याच्या दिनांकापासून त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढून घेण्यास मान्यता.
  • पुण्यातील स्पाईसर एडव्हान्टीस युनिव्हर्सिटी संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना निर्माण केली ती आता ‘सोनिया सेना’ झाली!

News Desk

सांगलीच्या व्यक्तींचा मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, प्रशासनाची चिंता वाढली

News Desk

“कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का ?”, राज ठाकरेंचा सवाल

News Desk