HW News Marathi
महाराष्ट्र

‘ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं…’, भाजपचा शिवनेला टोला

पुणे। कोरोनाचं सावट अद्याप गेलेलं नाही. तिसऱ्या लाटेची भीती दर्शवली जात आहे. कोरोनाचं सावट असताना राजकीय सभा सुरु आहेत आणि या गोष्टीवरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद सुरु आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार गर्दी न करण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले जात आहे. पण, त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्या या नियमांना केराटी टोपली दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन भाजप आमदाराने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शनिवारी खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. ट्विटरवर संजय राऊत यांच्या मेळाव्याचे फोटो शेअर करत अतुल भातखळकर म्हणले की,’अग्रलेख हे ज्ञान पाजळण्यासाठी, सल्ले देण्यासाठी, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असतात. गर्दीमुळे सर्वसामान्य जनतेला कोरोना होतो. पुण्यातील कार्यक्रमात उसळलेली ही गर्दी कोरोनाप्रूफ आहे बरं,’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर निर्बंधांमुळे टीका केली आहे. यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं ते म्हणाले आहेत.

हे कुठपर्यंत चालणार?

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dongri Building Collapsed : मृतांचा आकडा १४ वर, बचावकार्य सुरूच

News Desk

इन्कम टॅक्स विभागाचे 1100 छापे

News Desk

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले

News Desk