HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये MIM ला मोठा झटका, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

औरंगाबाद। औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक धक्का बसला आहे. MIM च्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढल्याचे दिसत आहे. नुकतेच लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का

संभाजीनगर’ असं नामांतर करण्याच्या हालचालींना मुख्यमंत्र्यांकडून वेग आलेला आहे. अशातच मनसे आणि भाजपनेही निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. काहीच दिवसांपूर्वी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू पदाधिकारी सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दशरथे हे शिवसेनेत कार्यरत होते. त्यामुळे शिवसेनेला हादरा बसल्याचं बोललं जात होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, मनसेची मागणी

News Desk

वंचितची काँग्रेसला ४० जागांची ऑफर, निर्णयासाठी १० दिवसांचे अल्टिमेटम…! 

News Desk

यशोमती ठाकूरांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, खिसे गरम करण्यासाठी…चित्रा वाघ यांची टिका !

News Desk