HW News Marathi
महाराष्ट्र

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालणारे मुख्यमंत्री पूजा चव्हाणला न्याय देणार का?” चंद्रकांत पाटलांचा सवाल  

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असा प्रश्न विचारला आहे. देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्याय देणार का? अशा प्रश्नांवर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलीस का चौकशी करत नाही? मुलीचे आई वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे. या सरकारची प्रतिमा डागळत चालली आहे, काही करा काही होत नाही, असे या सरकारच्या काळात झाले आहे, असा घणाघात पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप!

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, एसटी सेवा केली बंद

News Desk

उद्धवजी, टीम इंडिया समजून काम करा…अजून वेळ गेली नाही !

News Desk