HW News Marathi
महाराष्ट्र

थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…!, भाजपने पुन्हा साधला निशाणा

मुंबई । राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…”, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी एक कविता पोस्ट करत त्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्रही ट्विट केले आहे.

 

अतुल भातखळकर ठाकरे सरकारवर टीका करताना आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, “विचार वर्षभरातलं माझं एकतरी ठोस काम जनतेच भलं करणारं, मेंदूला ताण देत घे वर्षभराचा धोंडोळा, फुफ्फुसात पुरेशी हवा भर, मोठासा उसासा घे, स्मरल्या जर तोंडाच्या वाफा, पकाऊ FB लाईव्ह, बाष्कळ कोट्या, फालतू विनोद, सूडाचे कंड, थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’कडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत घेतली. मात्र, यावर आता विरोधकांकडून अत्यंत बोचऱ्या टीका होताना दिसत आहे. “उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीचा मूळ हेतू हा विरोधकांना धमकावण्याचाच आहे”, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्याच दिवशी म्हणजे काल (२८ नोव्हेंबर) सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. अशी भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाहीत, हे प्रकार नाक्यावर होतात. चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यांनी जपून बोलावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुछ तो गडबड है’अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची बोलकी प्रतिक्रिया !

News Desk

शरद पवारांचं मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना ‘या’ कारणासाठी पत्र !

News Desk

कर्ज मंजूरीसाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

News Desk