HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा प्रवास !

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण दररोज पेटत आहे. एकीकडे या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे राठोड यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याच सगळ्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. “मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास झालाय”, अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती. मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा वर्षभराचा प्रवास झाला आहे. एक मित्र म्हणून आमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर कमी होणार आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारावर पुढे जाणारे राज्य आहे. ऑडिओ क्लिप आहेत, आवाज हुबेहुब आहे. खोट्या ऑडिओ क्लिप कोणी तयार करत असतील तर पोलीस विभागाने कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात” असे म्हणत सुधीर मुनंगटीवार यांनी याप्रकरणामुळे राज्यात चुकीचा संदेश गेल्याबाबतही खंत व्यक्त केली आहे.

Related posts

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

News Desk

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

News Desk

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरे UGC च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात…

News Desk