नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप समारंभ आहे. या समारंभाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची विषेश उपस्थिती असल्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Dr Pranab Mukherjee ko humne sehej roop se amantran diya aur unhone humara sneh pehchan kar unhone sahmiti di. Unko kaise bulaya aur woh kaise ja rahe hain yeh charcha nirarthak hai: RSS Chief Mohan Bhagwat pic.twitter.com/5pkT4bmyvX
— ANI (@ANI) June 7, 2018
सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरकारची पाठराखन केली आहे. “सरकार बरंच काही करु शकतं, मात्र सरकार सर्व काही करु शकत नाही” असे बोलत सरकारची भागवतांनी पाठराखन केली आहे. संघ केवळ हिंदूच नाही तर सर्व समाजाला संघटित करण्याचे काम संघाकडून होते. भारतात जन्मलेला प्रत्येक जण भारताचा सुपुत्र असेही मोहन भागवत म्हणालेत.
मुखर्जींना या कार्यक्रमाचे दिलेले निमंत्रण त्यांनी का स्वीकारले यावर चर्चा करण्यात काहीही तथ्य नसल्याचे भागवत यावेळी म्हणालेत. प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण दिल्यानंतर देशात सुरु असलेली चर्चा केवळ निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी हे अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध आहेत असेही भागवत म्हणालेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.