HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांची कारकीर्द

मुंबई |राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. २१ ऑगस्ट १९५० ला बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या नारखेड येथे फुंडकरांचा जन्म झाला. एम.ए. अर्थशास्त्र असे शिक्षण झालेले फुंडकर हे शेतकरी कुटुंबातून पुढे आले होते. शालेय जीवनापासूनच फुंडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कामाला सुरुवात केली होती.

महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. त्यानंतर आणीबाणीविरोधात सत्याग्रह केल्यामुळे त्यांना तुरंगवास भोगावा लागला. त्यांच्या उत्कृष्ट राजकीय कामगीरीमुळे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीमत्व हरपल्याच्या भावना राजकीय वर्तुळात अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

फुंडकरांच्या राजकीय कारकीर्दीचा थोडक्यात आढावा

  • १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार
  • १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले
  • १९८५ पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
  • महाराष्ट्रात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद
  • लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा खासदार
  • विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते
  • सध्या ते विधानपरिषदेचे सदस्य
  • 8 जुलै 2016 रोजी पासून महाराष्ट्र राज्य कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली
  • भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवड
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही देवेंद्र फडणवीसांच अजब विधान!

News Desk

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची फेरतपासणी करावी 

News Desk

आमदार अमित साटम यांचा अस्लम शेख व महापौर पेडणकरांवर आरोप

News Desk
महाराष्ट्र

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

News Desk

गोंदिया | भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे २,७०,४७१ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे हेमंत पटले २,४३,२०४ मतांनी पराभूत झाले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. मधुकर कुकडे हे ४० हजार मतांनी विजयी झाले.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपच्या खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक घेण्यात आली. २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. परंतु मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे ४९ मतदान केंद्रावर ३० मे रोजी फेरमतदान घेण्यात आले.

Related posts

परिवहन विभागासाठी लगेच पैस दिले मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही? माजी उर्ज्यामंत्र्याचा सवाल

News Desk

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”, चंद्रकांत पाटलांचा शब्द

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

swarit