मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात वसईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माणिकपूर पोलिसांनी राजाराम मुळीक यांची तक्रार बारामती शहर पोलिसांकडे वर्ग केली आहे.
पडळकर काय म्हणाले होते?
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.