HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

सांगली | भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचा प्रत्येक नेता सांगतो. तर मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्या बंद दाराआडच्या चर्चेत नेमकं काय घडलं? कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं? हे राज्यातील सर्वसामान्य मतदारांना समजणं शक्यच नाही. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी त्या बंद दाराआडच्या चर्चेचा उद्धव ठाकरे यांनी कसा चुकीचा अर्थ घेतला, हे सांगितलं आहे. ते सांगलीत बोलत होते.

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह यांनी ‘देखते हैं’ असं म्हटलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी त्याचा अर्थ ‘हो’ असा घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सांगली महापौर निवडीचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणेच काही झालं असेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. कारण, शेवटी हे राजकारण आहे.

काय म्हणाले होते अमित शाह ?

अमित शाह यांनी कणकवली येथील कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, असा खुलासा केला. तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही, सांगतानाच यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा अमित शाह यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शाह यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमायक्रॉन बद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

News Desk

बच्चू कडू यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणी शिक्षा आणि जामीन

Aprna

विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी

News Desk