HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका, रोहित पवारांचे ‘हे’ प्रत्युत्तर 

मुंबई | “शरद पवारांच्या कामाचा वेग भयंकर आहे. मात्र, शरद पवार साहेब सध्या सरकारला मार्गदर्शन करत नाहीत असे वाटते”, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे कौतुक करतानाच त्यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “चंद्रकांत पाटील जी, तुम्ही भाजपाच्या चष्म्यातून राज्यतील महाविकास आघाडी सरकारचे काम बघत असल्याने कदाचित तुम्हाला ‘ज्येष्ठां’चे मार्गदर्शन दिसणार नाही. केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपतील लोकांच्या हे कदाचित लक्षात येणार नाही. आज राजकारणापेक्षा आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, हे आपण आतातरी मान्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो”, असे म्हणत रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार चंद्रकांत पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणतात कि, “शरद पवारांच्या प्रशासकीय तत्परतेसंदर्भात चंद्रकांत पाटील जी तुम्ही बोलता ते योग्यच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा राज्याला व देशाला नेहमीच झालाय. पण तुम्ही भाजपाच्या चष्म्यातून महाविकास आघाडी सरकारचे काम बघत असल्याने कदाचित तुम्हाला ‘ज्येष्ठां’चे मार्गदर्शन दिसणार नाही. आर्थिक संकट असतानाही काम जास्त व जाहिरातबाजी कमी या धोरणानुसार राज्य सरकार लोकांच्या हितासाठी झटतंय, पण केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपातील लोकांच्या हे कदाचित लक्षात येणार नाही. आज राजकारणापेक्षा आपल्यापुढील आव्हान मोठं आहे, हे आपण आतातरी मान्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.” रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांसह भाजपला टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

चंद्रकांत पाटील हे अनेकदा अध्यक्ष शरद पवारांवर बोचरी टीका करताना दिसून येतात. नुकतेच पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक करताना त्यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. “शरद पवारांच्या कामाचा वेग भयंकर आहे. संपूर्ण देशाने देखील तो पाहिला आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच त्यांच्यावर टीका करतो. पवारांनी या वयातही कोकण दौऱ्यावर जाऊन दोन दिवस मुक्काम केला. इतकं वय असतानाही ते आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता समस्येवर मात करत आहेत”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र पुढे. “शरद पवार साहेब सरकारला सध्या मार्गदर्शन करत आहे असे काही दिसत नाही”, असे म्हणत पवारांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. त्याचप्रमाणे, त्यांनी राज्य सरकारला सुनावण्याची संधीही साधली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पुढील ३ महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

News Desk

बोगस मतदान रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

News Desk

हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, राठोड प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया  

News Desk