HW News Marathi
महाराष्ट्र

दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना ‘मनसे’ टोला!

मुंबई। गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही मनसेकडून मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी हंड्या फोडण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत कोरोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

ज्यांना आंदोलन करण्याची खुमखुमी आहे त्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन करा..

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन करा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही….

काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट कोरोना वाटप. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली का?

केंद्र सरकारने राज्य सरकारला सणांमध्ये निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांच काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंजली दमनीयांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

News Desk

‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे, इथे प्रत्येकाला यायला आवडते त्यामुळे…’

News Desk

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना! – डॉ. नीलम गोऱ्हे

Aprna