HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

नवी दिल्ली | अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या मुद्द्याभोवती सध्या देशासह राज्यातील राजकारण फिरत आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये देखील मतमतांतरे असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेना खासदार संजय राऊत या तिन्ही नेत्यांची विधाने जर आपण लक्षात घेतली तर ते मतभेद स्पष्ट दिसतात. याच पार्श्वभूमीवर, आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसला या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी एक ट्विट करून काँग्रेसला हा घरचा आहेर दिला आहे.

संजय निरुपम या मुद्द्यावरून काँग्रेसला सल्ला देताना म्हणतात कि, “अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनावरून एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतेही कारण नसताना प्रश्नचिन्हे निर्माण केली आहेत. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाण्यास पूर्ण तयारी केली आहे. काँग्रेस कधीही राम मंदिर बनविण्याच्या विरोधात नव्हते.” त्याचप्रमाणे, “राम मंदिराबाबतचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर बांधले जाणार आहे. त्यामुळे, काँग्रेसने या वादापासून दूर राहिलेलेच बरे”, असा सल्ला संजय निरुपम यांनी काँग्रेसला दिला आहे.

राष्ट्रवादीचे म्हणणे काय ?

अयोध्या राम मंदिर हा शिवसेनेच्या जिव्हाळाच्या विषय असल्याने शिवसेनेची भूमिका काय असणार ? हा प्रश्न आहे. यातच आता राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चक्क एक सल्ला देण्यात आला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळावे”, असा थेट सल्ला आता राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे.

“उद्धव ठाकरे यांना अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, ते वैयक्तिकरित्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून उद्धव ठाकरे पूर्णपणे आपल्या वैयक्तिक क्षमतेत या सोहळ्याला हजेरी लावू शकतात. मात्र, एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रमुख या नात्याने त्यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला चालना देणे टाळावे”, असे माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लीम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करतात, माजी मुख्यमंत्र्यांचं मत

News Desk

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk

८२ वर्षाच्या पार्ले -जी बिस्किटाने लॉकडाऊनच्या काळात केली विक्रमी नोंद

News Desk