HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

मुंबई | २०२१ या नव्या वर्षाचे स्वागत लोकांनी सरकारच्या सुचना पाळत केले. याच नववर्षाच्या शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केलं आहे.नववर्षाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. कोरोना काळ आणि येणाऱ्या भविष्यात आपलं वर्तन कसं असावं, याविषयी त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. या पत्रात कोरोना काळात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांचं पत्र –

“गेले वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने कोरोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना काहीशा प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे. “पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.

“आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे,

“आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही”, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

News Desk

‘आव्हान-२०१७’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी स्वारातीम विद्यापीठाचा संघ कोल्हापूरला रवाना

News Desk

तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिक यांची राणेंवर टीका!

News Desk