मुंबई | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर्वपरिस्थितीत केरळ राज्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार-खासदारांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली
All MPs and MLAs of Shiv Sena to contribute their one month salary to Kerala Chief Minister's Relief Fund. #KeralaFloods pic.twitter.com/thCLMd95PT
— ANI (@ANI) August 20, 2018
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटींची मदत जाहीर केली . तसेच मुंबई पुण्यातून ८१ डॉक्टरांची टीमदेखील आज सकाळी केरळला रवाना झाली आहे. केरळमधील या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ३८५ जणांना मृत्यू तर हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही सुरु करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्थादेखील केरळ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.