HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी ?

मुंबई | वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नाराज मराठा समाजातील विद्यार्थ्यी गेल्या १० दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी उद्या (१७ मे) मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अध्यादेशाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. ही मुदत देखील ३१ मेपर्यंत वाढविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडेही वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढवून मागण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक पार पडली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महाजनांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन यांनी आध्यादेशाबाबत भाष्य केले होते.

महाजन यांनी सांगितले होते की, सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत असून याबाबत आम्ही १०० टक्के सकारात्मक आहोत. सर्वोच्च न्यायालयातूनही काही मार्ग निघतो का याची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करत आहोत. मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले का? ते हिंदू आहेत ना? – नारायण राणे

News Desk

५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपाई देखील शर्यतीत उतरणार

News Desk

मध्य रेल्वेकडून आणखी एक खुशखबर, राज्यात सुरु करणार आणखी ८ ट्रेन

News Desk