HW News Marathi
महाराष्ट्र

ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल! – आदित्य ठाकरे

पुणे |  शिक्षक हे आजच्या काळातील तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांनाही अद्ययावत करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पुढची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात. नवा देश, नवी पिढी घडविण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या माध्यमातून असे कार्य होईल आणि त्यातून देशाला नवी दिशा दिली जाईल, असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

देशासह जगभरातील प्राध्यापक या संस्थेला भेट देण्यासाठी पुण्यात येतील. आज शिक्षण पद्धतीत केले जाणार बदल आणि निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा लक्षात घेता येत्या काळात ऑक्स्फर्डला ‘पुणे ऑफ वेस्ट’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वाढविण्यावर भर देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार बापट यांनी संस्थेच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संस्थेचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यांनी संस्थेची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. राज्यातील 4 हजारपेक्षा अधिक महाविद्यालये आणि दीड हजार तंत्र शिक्षण महाविद्यालयातील सुमारे 1 लाख प्राध्यापकाना प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ संस्थेचे उपकेंद्र राहतील आणि त्याद्वारे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मान्यवरांच्या हस्ते जे.जे. महाविद्यालयाने तयार केलेल्या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गडचिरोली येथील युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या नागपूर येथील ज्ञान फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अजिंक्य कोटावार यांना पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते ‘यंग सोशल इनोव्हेटर’ म्हणून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी संस्थेतील नेतृत्व गुण विकसन केंद्र, नाविन्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान केंद्र,समानता आणि सर्वसमावेशकता केंद्र, बहुशाखीय अभ्यासक्रम अध्यापन केंद्र, ध्वनिमुद्रण कक्ष आदी विविध कक्षांना भेट देऊन कार्यप्रणालीची माहिती घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीक विम्याची रक्कम थकीत कर्ज म्हणून वसूल करण्याचे आदेश

News Desk

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, औरंगाबाद मुद्द्यावरुन सेना आक्रमक

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

News Desk