HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अफाट गर्दी

मुंबई । वयाची अठ्ठयाहत्तरी…चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही…शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या तमाम कार्यकर्त्याला तितक्याच उत्साहाने हसतच हस्तांदोलन…कधी मायेचा हात पाठीवर फिरवत तर कधी सोबत उभं राहून फोटोसेशन…असं जवळजवळ चार तास उभं राहून आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या… खासदार शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये अक्षरश: अलोट गर्दीचा महापूर पाहायला मिळाला… राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसाचा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या लोकनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी रांगाच रांगा लावल्या होत्या.

राज्यात भीषण दुष्काळ असून त्यामध्ये बळीराजा होरपळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या वाढदिवशी पुष्पहार, पुष्पगुच्छ किंवा भव्य असा कार्यक्रम सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला होता आणि कार्यक्रमांचा शक्य तो निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचे आवाहन केले होते त्यानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पक्षाच्यावतीने ‘चला देऊया मदतीचा हात’ ही संकल्पना अंमलात आणण्याचे आवाहन केले होते. आज खासदार शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या न थकता जवळजवळ चार तास उभे राहून शुभेच्छा स्वीकारल्या.

याचवेळी खासदार शरद पवार यांच्याकडे दुष्काळग्रस्तांसाठीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाच्याठिकाणी खासदार शरद पवार यांच्या आयुष्यातील घटनांचा वेध घेणारे प्रसंग फोटोप्रदर्शनातून मांडण्यात आले होते. खासदार शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी जसे उपस्थित होते तसेच विविध पक्षातील राजकीय नेते, पदाधिकारी मोठया संख्येने यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये उपस्थित होते.

यावेळी विशेष उपस्थिती ही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे माजी गृहमंत्री पी.जी.आर.सिंदिया यांची होती. सुरुवातीला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील,राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांसह सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय राजपत्रित अधिकारी आणि एमसीएचे पदाधिकारी यांनीही शरद पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डीत ड्रेसकोडवरुन वातावरण तापलं, फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई आज शिर्डीत

News Desk

वीज बिल आता सरासरीने देणार, उर्जामंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

swarit

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

News Desk