HW News Marathi
महाराष्ट्र

‘भारतरत्नां’च्या चौकशीऐवजी ‘त्या’ सेलिब्रिटींची चौकशी करा, भाजपची गृहमंत्र्यांकडे पत्रातून मागणी

मुंबई | ‘भारतरत्नां’च्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत, त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राम कदमांनी काँग्रेसची भाषा बोलणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहित भारतरत्नने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदमांनी केली.

अनिल देशमुखांचा निर्णय काय आहे?

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, भारतरत्नांचा सम्नान आम्हाला पण आहे. पण त्यांच्यावर कोणत्या भाजपच्या नेत्यांनी दबाव टाकला का हे पाहणे महत्वाचे आहे असेही ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”, आशिष शेलारांची सरकारवर टीका

News Desk

अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजी नाट्य ?

swarit

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? याची चौकशी करावी

News Desk