HW Marathi
महाराष्ट्र

निपाणीजवळील तवंदी घाटात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

निपाणी | पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात शनिवारी (५ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारच्या समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जण जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  चार पुरुष, एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील जमादार कुटूंबीय बेळगावकडे निघाले होते. तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जमादार कुटूंबिय असलेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकने या कारला १०० फूट अंतर फरफटत नेले. या अपघातात मृत झाल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

हा अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळावर बेळगाव पोलीस दाखल झाले असून बेळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक सुधीरकुमार रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. निपाणी येथील शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पूंज लॉईडचे कर्मचारी दाखल झाले आहे.

Related posts

अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली, ठाकऱ्यांचा भाजपला सवाल

News Desk

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण, अंनिसची ‘जवाब दो’ निषेध रॅली

अपर्णा गोतपागर

छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद

News Desk