मुंबई | लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील टॉप फाईव्ह खासदारांत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे. लोकसभेत कोणत्या राज्यातील खासदारांनी किती प्रश्न विचारले, यासंदर्भातील पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली. तसेच लोकसभेतील अपडेटसची ३१ मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली आहे, अशी माहिती परिवर्तनच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी दिली.
लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुळे यांनी २१२ प्रश्न उपस्थित केले आहेत. तर धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी २०२ प्रश्न विचारले असून आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही २०२ प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुधीर गप्ता यांनी १९८ तर झारखंडमधील जमदेशपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी १९५ प्रश्न विचारले आहेत.
दरम्यान. लोकसभेत शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खासदार गजानन किर्तीकर यांनी १९५ प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक मिळविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी १९४ प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.