नवी दिल्ली | “राज्यात उद्याच बहुमत चाचणी होणार,” असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (२६ नोव्हेंबर) दिला आहे. “उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाचपर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी झाला पाहिजे, शपथविधीनंतर लगेचच बहुमत चाचणी व्हावी,” असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या बहुमत चाचणी करण्यात होणार मतदान हे उघड पद्धतीने होणार असून या मतदानाचे लाईव्ह टेलिकास्ट करा, असे आदेश न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिले आहेत. या निकालाचे थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास शिल्लक राहिले आहेत. हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हंगामी अध्यक्षाच्या शर्यती एकूण १७ नावे सचिवालयाने राज्यपाल भगंतसिंग कोश्यारी यांच्याचे पाठविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल (२५ नोव्हेंबर) दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.
भाजपला विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी याचिका यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार देत, रविवारी (२४ नोव्हेंबर) या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, राज्यपालांनी भाजपला बहुमताचा दावा करणारे पत्र सोमवारी (२५ नोव्हेंबर) न्यायालयाचे महाधिवक्ता तुषार मेहता दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.