HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येणार, फडणवीसांचा विश्वास

मुंबई। राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीची काल (१४ नोव्हेंबर) बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान फडणवीस म्हणाले की, “सत्तास्थापनेबाबत येत असलेल्या कोणत्याही बातम्या किंवा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवून विचलित होऊ नका, असे म्हणाले. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, भाजपचे सरकार येणार आहे. भाजप वगळता कोणतेही सरकार होऊ शकत नाही. तुम्ही मुंबईत थांबू नका, पुढचे दोन तीन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावरच तुम्ही दिसले पाहिजे. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल यावर जातीने लक्ष द्या.”

भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत,” असा चिमटा त्यांनी काढला.

प्रथमच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर प्रथमच भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या आमदारांसह भाजपचे सर्व आमदार आणि पाठिंबा दिलेले तसेच मित्रपक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. कालच्या बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, व्ही सतीश, विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांची बैठक ही बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच ‘देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

News Desk

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी तटकरेंची नियुक्ती

News Desk

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk