HW News Marathi
महाराष्ट्र

बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई | एसटी महामंडळाकडून बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तब्बल ३३०७ एसटी कर्मचाऱ्यांची त्यांच्या इच्छित स्थळी बदली करण्यात येणार आहे. १० ते १५ वर्षे बदलीसाठी अर्ज करून वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची अखेर बदली करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यात कोकण प्रदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जेव्हा कोकणासाठी एसटीची जाहिरात देण्यात येते तेव्हा लोक मोठ्या संख्येने अर्ज करतात. मात्र, काम सुरु केल्यानंतर लगेचच ते दुसऱ्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी अर्ज देखील करतात. दरम्यान, ७ जानेवारी २०१९ पर्यंत एकूण ३३०७ एसटी कर्मचाऱ्यांची संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या इच्छित स्थळी बदली करावी, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ वर, तर पुणे ३, सातार १ रुग्णांची वाढ

swarit

अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ‘होम क्वारंटाइन’मध्ये ठेवले

News Desk

‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक!’

News Desk