HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेची मृत्यूशी झुंज, आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

वर्धा | वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये मानवतेला काळीमा फासणार घडना घडली आहे. पीडित प्राध्यापक तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या पीडित तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत असून पीडित तरुणी ही मृत्यूशी झुंज देत आहे. या घनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीयकडून आज (४ फेब्रुवारी) बंदचे आवाहन केले आहे. या मोर्चात विद्यार्थी, स्थानिक नागरिक, राजकीय नेते मोर्चात सहभागी होत आहेत. मुलीच्या उपचारासाठी सरकारी मदतीची पीडित तरुणीच्या वडिलांनी केली आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे (२७ वर्ष) ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तरुणीवर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने घटनास्थाळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हिंगणघाट शहरात आज (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर स्वार आलेल्या तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तरुणी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले. ही घटना एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात पीडित तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळाला असून तिची वाचाही गेल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna

धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेली रेणू शर्मा पुन्हा पोलिस ठाण्यात दाखल

News Desk