HW News Marathi
महाराष्ट्र

मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार !

पुणे | आगामी विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते सध्या भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर, “मला ५ वर्षांपासून ऑफर होती. विधानसभेत अनेक मंत्र्यांनी अनेकदा तुम्ही आमच्याकडे या असे म्हटले होते. मात्र, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी शरद पवारांसोबतच राहणार”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे. सत्तेला, लोभाला, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडून पक्ष सोडून गेलेल्यांची आम्हाला पर्वा नाही. आम्ही राष्ट्रवादीला राज्यात पुन्हा जिद्दीने उभे करू”, असा ठाम विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या आऊटगोईंगमुळे येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

News Desk

बुलडाण्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

पीडितेच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना स्वीकारणार – एकनाथ शिंदे

News Desk