मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आज (१६ फेब्रुवारी) जन्मदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर, सर्वपक्षीय नेत्यांनी जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छा खास ठरल्या आहेत. सत्यजित तांबे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा.” दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर, काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरत आहेत.
काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा. @Jayant_R_Patil pic.twitter.com/uLMyh34beU— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 16, 2021
जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले होते ?
“आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद सध्या नाही. प्रत्येक राजकारण्याला जशी इच्छा असते तशी माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इतका काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझी मतदारी आहे. यासाठी संख्या वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. ती संख्या जर वाढली आणि मोठा पक्ष झाला तर मग शरद पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल”, असे जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते.
विधानानंतर काय दिले होते स्पष्टीकरण ?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.