मुंबई । ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक आणि भाजप नेते सीताराम गायकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. सीताराम गायकर यांनी आज (१६ मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी चांगलीची टोलेबाजी केली आहे. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही”, असा बोचरा टोला लगावत जयंत पाटील यांनी सीताराम गायकरांचे पक्षात स्वागत केले आहे.
सीताराम गायकर यांच्या पक्ष प्रवेशादरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असतात की नाही, हे माहिती नाही. मी याच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी कोणी थांबायला तयार नव्हतं. मधुकर पिचड यांनी पक्ष का सोडला, हे अजूनही मला कळत नाही”, असे म्हणत जयंत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच पक्ष सोडून गेलेल्यांना टोलाही लगावला आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनेक पक्षातील नेत्यांना आदर आहे. अनेक जणांना आपल्या पक्षात यायचं आहे. राष्ट्रवादी हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे.” दरम्यान, अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांनी सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले. त्यानंतर हा सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला आहे. गेले अनेक दिवस गायकर यांच्या प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.